जळगावातील कंजरवाड्यात पोलीसांचा छापा; ६४ हजाराची दारू जप्त

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शनिवारपासून शहरातील सर्वच अस्तापना बंदावस्थेत असून संचारबंदी काळात तळीरामांची गैरसोय झाली असुन नेहमीप्रमाणे कंजरवाड्यात ब्लॅकने दारु विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

पोलिस धडकताच परिसरातील संशयीत रहिवासी घर सोडून निघुन गेल्याने केवळ तीन घरात दारु आणि बियरचा माल मिळून आला आहे. त्यानंतर कुसुंबा रायपुर येथे कारवाई करण्यात येवुन एकूण 64 हजार 291 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.

जळगाव शहरात सर्व अस्थापनांसह दारुबंदी आदेशही लागू करण्यात आले असून दारुबंदी काळात ब्लॅकने दारु विक्री होत असल्याच्या माहितीवरुन पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या पथकातील उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार आनंदसींग पाटिल, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटिल, संभाजी पाटिल, सचीन पाटील यांच्यासह पोलिस पथकाने दुपारी बारा वाजता जाखनी नगर कंजरवाड्यात छापेमारी केली. यात आकाश शंकर बागडे (वय-28) याच्या घरात 17 बियरच्या बॉटल, 14 देशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या, त्याच्यासहीत प्रेमा गजमल कंजर, भारती यशवंत गारुंगे अशा दोघांच्या घरातून हातभट्टीवर पाडलेल्या दारुसह कच्चे रसायन मिळून आल्याने पोलिसांनी ते नष्ट केले आहे. पोलिस नाईक गोविंदा पाटिल, मुकेश पाटिल, इम्रान सय्यद आसीम तडवी, सचिन चौधरी यांच्या पथकाने रायपुर कुसूंबा भागातून ढाब्याच्या अडोशाला विनोद गोविंदा लोहार (वय-27) ब्लॅकने दारु विकत असतांना सापडल्याने त्याच्या ताब्यातून 21 दारुच्या बॉटल्यासंह इतर माल जप्त करण्यात आला असून चौघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

विक्रेते घर सोडून पासार
कंजरवाडा, जाखनी नगर आणि तांबापुरा खदान परिसरातील नेहमीच्या हातभट्टीची दारु पाडणाऱ्या कंजर परिवारातील रहिवाश्‍यांनी पोलिस येताच घर होते तसेच सोडून पळ काढला. बहुतांश घर उघडेच तर काही आतून बंद असल्याने सर्च ऑपरेशन राबवुनही हव्या त्या प्रमाणात माल मिळून आला नाही.

Protected Content