जळगाव (प्रतिनिधी) शहरातील इच्छादेवी चौकात रस्त्याच्या कडेला उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. चार जून रोजी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक अशोक तिवारी (वय ३२, रा.दीक्षितवाडी) यांच्या मालकीचा हा ट्रक (एमएच १२ पीक्यु ५६०४) आहे. तिवारी यांच्या ट्रकवर जावेद गफ्फार पटेल (रा.तांबापुर) हे चालक म्हणून काम करीत होते. ३ जून रोजी पटेल यांनी ट्रक इच्छादेवी चौकात रस्त्याच्या कडेला उभा केला. यांनतर रात्री ११ वाजता त्यांनी रस्त्यावर येऊन ट्रक असल्याची खात्री केली होती. यानंतर ४ जून रोजी पहाटे ५.३० वाजता पटेल हे रस्त्यावर आले, त्यावेळी ट्रक तेथुन गहाळ झालेला हाेता. पटेल यांनी फोन करुन तिवारी यांना माहिती दिली. दोघांनी मिळुन परिसरात ट्रकचा शोध घेतला. परंतू, ट्रक मिळुन आला नाही. अखेर तिवारी यांच्या दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रकचाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.