जळगावच्या देवराज वाघचे सागरी जलतरण स्पर्धेत सुयश

jaltaran

जळगाव, प्रतिनिधी |  शहरातील देवराज किशोर वाघ हा जलतरणपटू सिंधुदुर्ग येथील ॲक्वॉटिक असोसिएशनतर्फे आयोजित जलतरण स्पर्धेत पहिल्या दहात येवून यशस्वी झाला आहे.

 

ही सागरी जलतरण स्पर्धा (चिवला बीच) येथे ५ किमी अंतराची घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत अनेक स्पर्धेत सहभागी झाले होते. देवराज हा मू.जे महाविद्यालयातील मायक्रो बायॉलॉजिचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. या स्पर्धेत यश मिळवीत त्याने सुवर्णपदकासह प्रमाणपत्र पटकावले आहे. यापूर्वी त्याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी तसेच इतरही काही स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्याच्या या यशात विभागप्रमुख के.पी  नारखेडे, प्रशिक्षक राजेश नेवे, वडील किशोर वाघ व आई जयश्री यांचे योगदान आहे. त्याच्या यशाबद्दल मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी तसेच पालक व मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.

Protected Content