Home Cities जळगाव जळगावकरांना गुढीपाडवा पहाट संगीत कार्यक्रमाची मेजवानी

जळगावकरांना गुढीपाडवा पहाट संगीत कार्यक्रमाची मेजवानी

0
23

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हिंदू नववर्ष निमित्त शनिवार दि. २ एप्रिल रोजी आ. राजू मामा भोळे यांच्या तर्फे  गुढीपाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

चैत्र शुद्ध ,प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तथा आ.राजूमामा भोळे यांच्या वतीने शहर वासियांसाठी शनिवार दि. २ एप्रिल रोजी पाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान बाजूला सकाळी ६.०० वाजता संपन्न होणार आहे. तरी या गुढी पाडवा पहाट संगीत कार्यक्रमाला जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.


Protected Content

Play sound