श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादी निधी पुरवठा प्रकरणी १४ जिल्ह्यांमध्ये ४५ ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत.
जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएकडून ही कारवाई केली जात आहे.
पाकिस्तानला तसंच फुटीरतावाद्यांना समर्थन करणाऱ्या जमात-ए-इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने २०१९ मध्ये बंदी टाकली आहे. बंदी असतानाही जमात-ए-इस्लामीकडून सुरु असलेल्या कारवाया रोखण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकण्यात आले आहेत. या धाडी टाकण्याआधी दिल्लीमधून वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम श्रीनगरला रवाना झाली.