फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमास हजेरी लावलेला फैजपूर येथील एक इसम आज कोरोनाचा संशयित म्हणून जिल्हा रूग्णालयात दाखल झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, दिल्लीतल्या निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमात कोरोनाच्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचे आता स्पष्ट झाले असून येथे हजेरी लावलेल्यांचा शोध घेतला जात आहे. याआधी निजामुद्दीनच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील तेरा जणांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली होती. तथापि, निव्वळ मोबाईल लोकेशनवरून घेण्यात आलेली ही माहिती अपूर्ण असल्याने या कार्यक्रमाला कुणी हजेरी लावली हे सिध्द करणे शक्य नव्हते. दरम्यान, निजामुद्दीन येथील कार्यक्रमात फैजपूर येथील ६३ वर्षाच्या व्यक्तीने देखील हजेरी लावली होती. यानंतर हा व्यक्ती २२ मार्च रोजी फैजपूर येथे आला होता. गत दहा दिवसांपासून त्याने याबाबतची माहिती कुणाला सांगितली नव्हती. तथापि, आता तबलिग कार्यक्रमातील संसर्गाबाबत बोभाटा झाल्यानंतर हा व्यक्ती आज सायंकाळी कोरोनाचा संशयित रूग्ण म्हणून जिल्हा रूग्णालयात रात्री दाखल झाला आहे. येथे त्याची चाचणी करण्यात येणार असून याच्या निष्कर्षानुसार उपचार करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००