जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जबरी चोरी व विनयभंग प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या संस्थेला स्थानिक गुन्हे शाखेने रविवार 26 फेब्रुवारी अटक केली आहे. केवल अनिल टाक (वय-२७ रा. वाल्मिक नगर, जळगाव) असे अटकेतील संशियताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध गुणधर्म पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्याबाबत मोहीम राबवीण्याचे सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरी व विनयभंग या पुण्यात फराळ असलेल्या संशयित हा त्याच्या भुसावळ शहरातील वाल्मीक नगर येथील राहत्या घरी असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे साहेब फौजदार रवींद्र नरवाडे पोलीस हवालदार कमलाकर बागुल अनिल देशमुख रणजीत जाधव श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने संशयित केवल टाक यास रविवारी त्याच्या राहत्या करून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.