भुसावळ प्रतिनिधी । जबरी चोरी करून दिड वर्षांपासून फरार आरोपीला भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात २ ऑगस्ट २०१९ रोजी भाग ५ गुरनं ४२२/२०१९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी तुषार भास्करराव सुरे (वय-३१) रा. गांधी नगर हा संशयित आरोपी गेल्या दीड वर्षांपासून फरार होता. विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार बाजार पेठ पोलीस ठाण्याचे शोध पथकाने सोमवार २८ डिसेंबर रोजी राहत्या घरातून संशयित आरोपी तुषार सुरे याला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, , प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक फौजदार अनिल अडकमोल, पो.ना. रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहा.फौज.अनिल अडकमोल करीत आहेत.