Home राजकीय जनता जयचंद आणि मीर जाफरांना धडा शिकवणार ! – काँग्रेसची टीका

जनता जयचंद आणि मीर जाफरांना धडा शिकवणार ! – काँग्रेसची टीका

0
33

नवी दिल्ली । ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरूण यादव यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची जयचंद आणि मीर जाफर यांच्याशी तुलना केली आहे.

याबाबत वृत्त असे की, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून अधिकृतपणे याबाबत आपल्या ट्विटर हँडलवरून घोषणा केली आहे. ही घोषणा होताच काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. पक्षाचे माजी मध्यप्रदेशचे अध्यक्ष अरूण यादव यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले असून यात म्हटले आहे की, जनता जयचंद आणि मीर जाफर यांना नक्कीच धडा शिकवणार आहे. या माध्यमातून त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना गद्दार म्हटले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली आहे.


Protected Content

Play sound