छावा मराठा युवा महासंघाची जळगाव महानगरची कार्यकारणी बरखास्त

 

जळगाव प्रतिनिधी । छावा मराठा युवा महासंघाची  जळगाव महानगरची कार्यकारणी बरखास्त करणात आली असून उप जिल्हाध्यक्ष श्रीकांत मोरे यांना पदमुक्त करण्यात आले आहे. 

छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील व महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली राक्षे यांच्या आदेशानुसार छावा  मराठा युवा महासंघ जळगाव महानगरीची समस्त कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.  जळगाव महानगर कार्यकारिणी बरखास्ती बाबतची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे देत लवकरच नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल असे कळविले आहे.  छावा मराठा युवा महासंघाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत मोरे यांना वारंवार सूचना देऊनही ते संघटनेची शिस्त व आचारसंहिता भंग करीत असल्यामुळे श्रीकांत मोरे यांना जिल्हा उपाध्यक्ष या पदावर पदमुक्त करण्यात येत असल्याचेही जिल्हाध्यक्ष कोल्हे यांनी कळविले आहे.

 

 

Protected Content