जळगाव : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, अव्वल कारकून गणेश साळी, महसूल सहायक प्रकाश शेळके यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.