पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील शेतकी संघ आवारातील राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थित आहे. मागिल वर्षीच्या संक्रात २०२२ चे औचित्य साधुन राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहीस्नान सोहळ्यास आज वर्षपुर्ती झाली. या अनुषंगाने आज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा शाहीस्नान सोहळा आयोजित करण्यात आला.
आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी, कृउबाचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या विशेष सहकार्याने व सामाजिक कार्यकर्ते विजय निकम यांच्या संकल्पनेतुन पुतळा उभारण्यात आला होता. आज पुतळा स्थापनेला १ वर्ष पुर्ण झाल्याने हा शाहीस्नान सोहळा बाजार समितीचे संचालक चतुर बाबुराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
सालाबादाप्रमाणे या वर्षीही हा सोहळा अतिशय आनंददायी पार पडला. तसेच हि परंपरा वर्षानुवर्षे असिच सुरू राहणार असल्याचा पुनःच्छ संकल्प विजय निकम यांनी केला. यावेळी गेल्या वर्षभरापासुन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जलस्नान करणारे धनाआप्पा यांचा व दैनंदिन पुष्पहार अर्पण करणारे जितु बारी यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, शेतकी संघ मा.चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डाॕ.शांताराम पाटील, शेतकी संघाचे मा.व्हा.चेअरमन भिकन महाजन, सखाराम चौधरी, संचालक संचालक राजेंद्र पाटील, उपतालुकाप्रमुख राजेंद्र पवार, युवासेना शहरप्रमुख विशाल मेटकर, बाजार समिती संचालक प्रा.बी.एन.पाटील सर, प्रेमानंद पाटील, तरडी येथील भैय्यासाहेब पाटील, मुंदाणे प्र.ऊ.येथील एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, उंदीरखेडे सरपंच गणेश पाटील, नंदकुमार पाटील सर, सोनवने मेडीकलचे संचालक सोनवणे, शेतकी संघ चेअरमन गणेश पाटील, विचखेडे सरपंच रविंद्र पानपाटील, मा.सरपंच अशोक महाजन यांचेसह शिवप्रेमी व विचखेडे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.