चाळीसगाव, प्रतिनिधी | कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. अशांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी समता सैनिक दलाने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
सर्वांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना काही जणांनी कर्नाटक राज्यात केली आहे. दरम्यान राजकीय मुद्दा बनवून काही समाजकंटकांनी त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटून ठिकठिकाणाहून जाहीर निषेध नोंदविले जात आहे. याचाच भाग म्हणून चाळीसगाव येथील समता सैनिक दलाने घडलेल्या घटनेचे जाहीर निषेध नोंदवून कारवाईची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
निवेदनावर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभुषन बागुल, जिल्हा सचिव भाईंदास गोलाईत, तालुकाध्यक्ष स्वप्निल जाधव, तालुका सचिव बाबा पगारे, तालुका उपाध्यक्ष मोरे, संपर्क अधिकारी नितीन, ज्ञानेश्वर अहिरे, उमेश पवार, शशिकांत जाधव, वैभव महाले, अरविंद पाटील, किरण महाले, प्रदिप चौधरी, जीवन जाधव, सुनील महाले, मिलिंद भालेराव, विलास निकम, बागुल, निवृत्ती बागुल, ज्ञानेश्वर बागुल, निखिल घोडेस्वार, प्रकाश सोनवणे, राकेश सोनवणे, बिपू सोनवणे, नाना गायकवाड, घनश्याम बागुल, नेहा राठोड, प्रेरणा खैरनार, प्रियंका बागुल, अशोक सोनवणे, शाकीर शहा, कय्युम खान, कौस्तुभ मोरे व प्रविण पाटील आदींनी सह्या केल्या आहेत.