छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

 

मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाचा वाढता प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील आठ दिवस परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केले आहे. यातच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.’ विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. शरद पवार आणि भुजबळ एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने आता शरद पवारांचीदेखील करोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

 

Protected Content