जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस स्थापना सप्ताह निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने चोरीस गेलेला मुद्देमाल मुळ तक्रारदार यांना जिल्हा न्यायालयाच्या परवानगीने जिल्हा मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याहस्ते देण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल चोरी, घरफोडी तसेच जबरी चोरीचे वेगवेगळे गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक मदतीचे आधारे मुद्देमालासह या गुन्ह्यांची उकल करत काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली. जप्त केलेला मुद्देमाल हा मुळ तक्रारदार यांना देण्यात यावा हा हेतू ठेवून जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने जळगाव जिल्हा न्यायालय यांच्या परवानगीनुसार शुक्रवार ६ जानेवारी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे जळगाव जिल्हा पोलीस घटकात विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व मालमत्ता गहाळ गुन्ह्यातील तक्रारदार यांना चोरीस गेलेला मुद्देमाल देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याहस्ते तक्रारदारांना मुद्देमाल देण्यात आला. याप्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तक्रारदारांना आपला चोरीला गेलेला मुद्देमाल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते.