चोरीच्या १४ दुचाकींसह अट्टल गुन्हेगाराला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि अमळनेर तालुक्यातून चोरीला गेलेल्या दुचाकीसह अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी १९ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल चोरीच्या १४ दुचाकी हस्तगत केल्या आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजय अंबालाल पावरा (वय-२७) रा. वकवड ता. शिरसोली जि.धुळे असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि अमळनेर तालुक्यात अनेक ठिकाण दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा अमळनेर शहरात चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल, कमलाकर बागुल, संदीप पाटील, संदीप साळवे, पोलीस नाईक प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लोकेश माळी, अशोक पाटील यांनी कारवाई करत रविवारी १९ मार्च रोजी अमळनेर शहरातून संशयित आरोपी अजय अंबालाल पावरा रा. वकवड ता. शिरपूर जि. धुळे याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकूण चोरीच्या १४ दुचाकी काढून दिल्या. स्थानिक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन दुचाकीसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे यासंदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content