जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीच्या पाच दुचाकींसह दोन संशयित आरोपींना आज तांबापुऱ्यातून अटक केली आहे. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरुख जहूर खाटीक (वय-२५, रा.तांबापुर) आणि फारुख शेख मुस्तफा (वय-३२,रा. राजा कॉलनी) असे अटक केल्या संशयित आरोपींची नावे आहे. दोघांकडून चोरीच्या पाचा दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेश यशवंत देशपांडे (वय-२५) रा. महाबळ रोड, संभाजी नगर हे ११ मे २०२० रोजी सकाळी ७ वजाता लस घेण्यासाठी शहरातील छत्रपती शाहू महाराज लसीकरण केंद्रावर दुचाकी (एमएच १९ एझेड ९०८७) ने आले होते. ही दुचाकी लसीकरण केंद्रासमोर पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी लांबविली होती. देशपांडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी पोलीस कॉन्स्टेबल अक्रम शेख यांच्याकडे गुन्ह्याचा तपास होता.
पोहेकॉ अक्रम शेख यांनी गुन्ह्याच्या तपासाचा शोध घेण्यास सुरूवात केली. गेल्या दोन दिवसांपासून संशयित आरोपी शोधात होतो. दोन संशयित आरोपी हे तांबापूऱ्यातील असल्याचे निष्पन्न झाले. आज सोमवारी १४ जून रोजी दोघांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ अक्रम शेख, भास्कर ठाकरे, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर, पोहेकॉ विजय निकुंभ, रतन गीते, किशोर निकुंभ, उमेश भांडारकर यांनी तांबापूरा येथील शाहरुख जहूर खाटीक (वय-२५, रा.तांबापुर) आणि फारुख शेख मुस्तफा (वय-३२,रा. राजा कॉलनी) यांना आज सोमवारी सकाळी ६ वाजता राहत्या घरातून अटक केली. दोघांची चोरीच्या पाच दुचाकी रावेर तालुक्यातून काढून दिल्या आहे. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर हद्दीतील चोरीच्या ५ दुचाकीसह दोन संशयित आरोपींना शहर पोलिसांनी आज अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहर हद्दीतील चोरीच्या ५ दुचाकीसह शाहरुख जहूर खाटीक (वय-२५, रा.तांबापुर) आणि फारुख शेख मुस्तफा (वय-३२,रा. राजा कॉलनी) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पाच चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. दोन्ही संशयित आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्रम शेख, भास्कर ठाकरे, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर, विजय निकुंभ, रतन गीते, किशोर निकुंभ, उमेश भांडारकर यांनी कारवाई केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/236018957960887