जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकसमोरील हॉस्पिटल समोरील दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीला दुचाकीसह अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राहुल गणेश महाजन (वय-१९) रा. तांबापुरा, जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, वसीम अहमद नुर अहमद पटेल (वय-२९) रा. मास्टर कॉलनी, मेहरूण हे लेस कॉन्सियाजेस या कंपनीत नोकरीला आहे. (एमएच १९ डीजे ५९६८) ही मित्रांची दुचाकी वापरण्यासाठी घेतली आहे. २५ ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलाची तब्बेत बरोबर नसल्याने ते दुचाकीवर शहरातील आकाशवाणी चौकातील अटल हॉस्पिटलमध्ये आहे. दुचाकी हॉस्पिटलमध्ये रात्री ९ वाजेच्या सुमारास पार्किंगमध्ये लावली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी प्रविण भोसले यांना चोरलेली दुचाकी घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीच्या काही हालचाली संशयास्पद आढळून आल्यात. अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरी असल्याची कबुल केल्यानंतर संशयित आरोपीला दुचाकीसह रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.