पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील चोरवड हे प्रभूदत्त महाराजांचे जागृत देवस्थान यात्रोत्सव मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रोत्सवाला सुरुवात होते. या आज दि. १८ तारखेपासून यात्रोत्सवास मोठ्या उत्सहात सुरुवात झाली. या यात्रोत्सवास खासदार उन्मेष पाटील व पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांनी भेट दिली.
मंदिर हे महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे एकमेव स्थान आहे. या ठिकाणी पालखी मिरवणुकीला खूप महत्व असते. आज प्रारंभ झालेल्या यात्रोत्सवास खासदार उन्मेष पाटील व पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांनी भेट देवून दर्शन घेतले. साधारणत: आठवडाभर यात्रा चालते. चोरवड गावालगत असलेल्या परिसरात ह्या यात्रेचे दरवषी आयोजन करण्यात येते. आज भाविकांसह भगवान दत्त महाराजांचे दर्शन घेतले. याप्रसंगी पारोळा नगराध्यक्ष करण दादा पवार,चोरवड सरपंच राकेश पाटील , उपसरपंच किरण माने , ग्रा प सदस्य सुनील पाटील ,ग्रा प अरुण पाटील, राजू पाटील , मल्हार कुंभार , विश्वास पाटील , प्रल्हाद कुंभार , अतुल पाटील , मोनु माने , विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मपंचायतीतर्फे जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील व पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांचा सत्कार करण्यात आला.
चोरवड येथील श्री दत्त मंदिराची आख्यायिका
चोरवड येथे सुमारे ४०० वर्षापासून दत्त जयंती साजरी केली जाते. चोरवड गावाच्या पश्चिम दिशेला श्री दत्त महाराजांच्या दोन स्वतंत्र लहान व मोठ्या मंदिरात मूर्ती इ.स.१६०२ मध्ये स्थापना करण्यात आली होती. याबाबत सांगितले जाते की, रावजी बुवा नामक व्यक्ती गावाबाहेर वास्तव करत असे. बाबा महानुभाव भिक्षुकी असल्याने बुवा भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. रावजी बुवा नियमित माहुरंग गडाची वारी करीत असे. उतरत्या वयात वारी करणे शक्य न झाल्याने त्यांनी तसे मंदिरात देवा समोर सांगितले व त्यांच्या झोळीत दोन झेंडूची फुले आली. नंतर ते चोरवडला आले असता त्या फुलांचे रुपांतर दत्तच्या मूर्तीत झाल्याची आख्यायिका सर्वश्रुत आहे. तसेच तसेच यापैकी मोठे दत्त मंदिर हे जवळपास १५० वर्ष छत नसताना उभे होते. या मंदिराचे छत एकाच रात्री बांधले गेले असे सांगितले जाते.