चोरट्यांनी चक्क फळांची टपरीच लांबविली; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील नारायण पार्क जानवी हॉटेलजवळ असलेल्या फळ विक्रेत्याची दुकानाची टपरीसहीत फळे असा एकुण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बळीराम जाधव (वय 37 रा.म्हळसाई पार्क ज्ञानदेव नगर, जळगाव) हे फळ विक्रेते आहेत. त्यांची नारायण पार्कयेथील जानवी हॉटेलजवळ फळ विक्री करण्याची लोखंडी टपरी आहे. फळ विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ फेब्रुवारी रोजी दिवसभर विक्री करून रात्री ९ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फळे असलेली टपरीच चोरून नेली. त्यात सर्व प्रकारची फळे असा एकुण ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरुवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आला आहे. याबाबत सुरेश जाधव यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परीष जाधव करीत आहे.

Protected Content