चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावाजवळून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे डंपरसह एक वाहनावर चाळीसगाव शहर पोलीसांनी कारवाई केली. दोनही वाहने पोलीसांनी जप्त केले आहे. गुन्ह्यातील तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
चाळीसगाव शहर पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडागावाच्या नजीक असलेल्या रोडवरून अवैधरित्या वाळूचे वाहतूक करणारे डंपर भडगावरोड ने चाळीसगावकडे येत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या पथकातील आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, शरद पाटील, पवन पाटील, समाधान पाटील, अमोल पाटील, महेश बागुल यांनी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता कारवाई करत पातोंडा गावानजीक वाळूने भरलेले डंपर चाळीसगाव शहर पोलीसांनी पकडले. शिवाय कोणताही शासकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी यावर कारवाई करू नये यासाठी देखरेख करणारे वाहन देखील पोलिसांनी पकडले आहे. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस कॉन्स्टेबल समाधान पोपट पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर मालक गणेश प्रभाकर पाटील रा. देवळी ता.चाळीसगाव, रामदास नथू चव्हाण रा. तारखेडा ता. पाचोरा आणि निखिल सुनील कुंडे रा. चाळीसगाव या तिघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहे.