चोपड्यात राहुल ढिवरे यांच्या जलरंग निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

 

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी व भगिनी मंडळ चोपडा संचलित, ललित कला केंद्र, येथील माजी विद्यार्थी राहुल तुकाराम ढिवरे  यांच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन  प्रसिद्ध अक्षरचित्रकार कलाशिक्षक पंकज नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राहुल ढिवरे  यांच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाप्रसंगी उद्घाटक नागपुरे यांनी आपले स्वतः विद्यार्थी असतांना कला शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाने मी इतके यश मिळवू शकलो. प्रचंड मेहनतच तुम्हाला उंच शिखरावर नेते असे ही प्रतिपादन केले. निसर्ग चित्रकार राहुल ढिवरे यांनी संपूर्ण कला शिक्षणात वेळोवेळी शिक्षकांचे मार्गदर्शन कसे घेतले कोणत्या शिक्षकांनी काय दिले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे उच्च शिक्षण घेते वेळी ललित कला केंद्र चोपडा या संस्थेतील गुरुजनांच्या मार्गदर्शनानेच मी इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही मेहनत करा ती मोजू नका आपोआप आपल्याला फळ मिळत राहील तसेच या ललित कला केंद्राने मला जगायला व बोलायला शिकवले अशी भावना व्यक्त केली.  याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. राहुल ढिवरे हे आंत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीतून पराकोटीच्या कष्टाने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे पोहचले व वार्षिक प्रदर्शन आणि महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातून बक्षीस मिळविले. याप्रसंगी शांतिनिकेतन येथे एम. एफ. ए.सिरॅमिक अॅड पाॅटरी करीत असलेले देवेंद्र बरडे,केमिकल इंजिनियर नचिकेत नेवे उपस्थित होते. तर प्रा. संजय नेवे यांनी सूत्रसंचालन केले. चित्र प्रदर्शनाची मांडणी व सजावट प्रा. विनोद पाटील, प्रा. सुनील बारी यांनी केली. भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रविण मानकरी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content