चोपड्यात  महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी ।  शहरातील कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे 29 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. चर्चासत्राचा विषय ईव्हालविंग ट्रेन्डस् इन अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन, मॅनेजमेंट ,अँड सोशल सायन्स असा राहणार आहे.

या चर्चासत्रासाठी  गुजरातहुन डॉ. सबत डीग्गल डॉ. अरविंद चौधरी डॉ.पी.आर.चौधरी, डॉ. मधुलिका सोनवणे, डॉ. पवित्रा पाटील, डॉ.पी. पी. छाजेड इत्यादी महनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील राहणार असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश जी. पाटील संस्थेचे उपाध्यक्ष आशा पाटील संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.
सदर चर्चासत्रास देशभरातून 103 पेपर्स आलेले असून सदर पेपर जॉइस केअर लिस्ट ( दिल्ली ) या  मानांकित पब्लिकेशन मधून सादर होणार आहेत या चर्चासत्रात शोध प्रबंधक उत्तम रित्या सादर करणाऱ्या शोध प्रबंधकास बेस्ट इटाटमस 2020 आवर्ड देण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास उपस्थितीचे आव्हान प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी व संयोजक प्रा.सी.आर. देवरे यांनी केले

Protected Content