चोपडा प्रतिनिधी । येथील महावीर नागरी सह पतपेढीचे चेअरमन रेखा शांतिलाल बोथरा व संस्थापक चेअरमन तथा विद्यमान प्रा.शांतिलाल बोथरा यांना सहा.निबंधक यांनी अपात्रतेसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
भाईचंद हिराचंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जळगाव येथून व महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित चोपडा या संस्थामधून कोट्यवधी रुपयाचे कर्ज घेतलेले असून सदर कर्ज थकित झालेले आहे. तसा अहवाल संबंधित संस्थाने दिलेला आहे. याबाबत एका तक्रारदाराने सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे चेअरमन व संचालकांच्या अपात्रते संबंधी तक्रार अर्ज केला आहे. सदरील तक्रार अर्जावर सहायक निबंधकांनी २७ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली असून महावीर पतसंस्थेचे व्यवस्थापक यांना २७ रोजी संचालक मंडळाची येणे कर्ज व थकबाकी यादिसह संपूर्ण रेकॉर्डसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. त्याच प्रमाणे मागील अनेक दिवसांपासून संस्थेची ८९ (अ) प्रमाणे चौकशी देखील सुरू आहे
पतसंस्थाचे कोट्यावधीचे कर्ज थकीत असल्याने ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा कोणाकडे मागावा असा प्रश्न ठेवीदारांमध्ये चर्चिला जात आहे. ठेवीदारांचे ठेवी देखील असुरक्षित झाली की काय? असे शहरात चर्चिले जात आहे. अपात्रते पुर्वी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आता २७ रोजीजच्या चौकशीकडे चोपडावासियाचे लक्ष लागून आहे.