Home आरोग्य चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे डाॅक्टरांचा सत्कार

चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे डाॅक्टरांचा सत्कार

0
23

चोपडा, प्रतिनिधी । राष्ट्रीय डाॅक्टर दिनानिमित्ताने आज १ जुलै रोजी चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला. चोपड्याचा कोवीड सेंटरमध्ये सेवा देणारे डाॅ.मनोज पाटील यांचा शाल, पुष्पहार व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळात,स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व डाॅक्टरांचा हा प्रातीनिधीक स्वरूपाचा सत्कार आहे अशी भावना चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के.डी.चौधरी (सर) यांनी व्यक्त केली. डाॅक्टर म्हणजे परमेश्वराचेच रूप आहे, तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व डाॅक्टरांना राष्ट्रीय डाॅक्टर्स दिनानिमित्ताने चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी चोपडा तालुका काँग्रेस अध्यक्ष राजारामबापू पाटील, चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के.डी.चौधरी (सर), बी.एम.पाटील, चोपडा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण पाटील, सुर्यकांत चौधरी उपस्थीत होते.


Protected Content

Play sound