चोपडा प्रतिनिधी । येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे राजयोगी जीवनशैलीद्वारे निरोगीठ जीवन या उपक्रम अंतर्गत अलविदा डायबिटीज मधुमेहाचे कारण, निवारण, तसेच संपूर्ण नियंत्रण मार्गदर्शन करण्यासाठी मालेगाव येथील तज्ञ मार्गदर्शक डॉ. मल्हार देशपांडे, डॉ. उज्वल कापडणीस हे करणार आहेत.
डॉक्टरानी माऊंट आबू येथून प्रेरणा घेऊन भारतभर कार्यशाळा घेत आहे. ही कार्यशाळा २९ फेब्रुवारी व १ मार्च हे दोन दिवस राहणार आहे. या कार्यशाळेत आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहणार असून दुपारचे जेवण व चहा पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे ह्या कार्यशाळेसाठी नोंदणी मोफत असली तरी नोंदणी केलेल्या लोकांनाच कार्यशाळेत बसता येणार आहे यासाठी आपले नाव नोंदणी प्रभुचितन भवन, ओम शांती नगर, यावल रोड चोपडा येथे सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ८ वाजेपर्यंत करून घ्यावे नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख २५ फेब्रुवारी पर्यंतच राहणार आहे असे आवाहन आयोजक प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे प्रमुख बी.के.मंगलादीदी, बी.के.राजदीदी बी.के.सारिकादीदी यांच्यातर्फे करण्यात आले आहे. तरी या निशुल्क कार्यशाळेचे जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन देखील आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.