चोपडा प्रतिनिधी । येथील गायत्री शक्तिपीठ मंदिरात गायत्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गायत्री देवीला भारतीय संस्कृतित जन्मदात्री मानली जाते. गायत्री मातापासुन चार ही वेदांची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. वेदांचे सार गायत्री मंत्राला मानले जाते, अशी मान्यता आहे की चार ही वेदांचे न्यान घेण्याबरोबर फक्त गायत्री मंत्र म्हटले तरी चार ही वेदांचे न्यान मिळते.
चोपडा शहरातील गायत्री देवी मंदिरात आज सकाळपासून पूजा अर्चा, होम हवन करुन गायत्री जयंती मोठ्या उत्साहने साजरी करण्यात आली. त्यावेळी भंडारा म्हणजे महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. गायत्री जयंतीचे महत्व व आख्यायिका गायत्री देवी मंदिराचे अध्यक्ष रमेश विसपुते यांनी विशद करण्यात आले.