चोपडा प्रतिनिधी । शहरातील जिजाऊ नगरात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकण २६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.
अधिक माहिती अशी की, कैलास जगन्नाथ पाटील (वय-३८) रा. जिजाऊ नगर चोपडा हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. १३ जुलै सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने घराचे कुलूप लावून बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील १६ हजार रूपयांची सोन्याची अंगठी आणि १० हजाराची रोकड असा एकुण २६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी कैलास पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप भोई करीत आहे.