चोपडा-भुसावळ रस्ता खराब असल्याने अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता; सा.बां.चे दुर्लक्ष

यावल प्रतिनिधी I तालुक्यातील चोपडा ते भुसावळ पर्यंतच्या राज्य मार्गावर सातत्याने वाढणारी अवजड वाहनांची वर्दळ इतर वाहनांना वाहतुकीस व अपघातांना कारणीभूत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ कार्यालयाने तातडीने लक्ष देवून त्वरीत अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालावी अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे .

दरम्यान चोपडा ते यावल भुसावळ या राज्य मार्गावरील सुमारे ७० किलोमिटरच्या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन , रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन , रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हे बोलणे अवघड झाले आहे . या मार्गावर अनेक वाहनांधारकाचे वाहन चालवितांना खड्डे वाचवीण्याच्या प्रयत्नात भिषण अपघात होवुन आपला जिव गमवावे लागले आहे . या संदर्भात बांधकाम सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार चोपडा, यावल ते भुसावळ या राज्य मार्गावरील रस्त्याची वाहन वाहतुक वजन क्षमताही १०ते १२टनाची असतांना या रस्त्याने १५ते २०टन क्षमतेच्या वाहनांची मोठी वाहतुक वाढल्याने व इतर वाहनांचीही वाहतुकीची वर्दळ सातत्याने वाढल्याने रस्ता मोठया प्रमाणावर सिंक होतांना दिसुन येत असुन, यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होत असल्याने या मार्गावरील रस्त्याला अनेक वेळा लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात येत कामांवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर आणी संबंधीत काम करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या कामाच्या गुणवत्ते वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यावल आणी आरटीओ विभागाने संयुक्तपणे प्रयत्न केल्यास या मार्गावरील वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुक प्रश्न मार्गी लागेल व त्यामुळे या वाहनांच्या वाढत्या गोंधळामुळे वारंवार होणारे अपघात व यात मरण पावणाऱ्या निरपराध वाहनधारकांचे जिव तसेच रस्ता दुरूस्तीच्या नांवाखाली वारंवार होणाऱ्या शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीला वाचविण्यास मदत होईल.

Protected Content