चोपडा प्रतिनिधी । येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चोपडा व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन सुरू आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांना
रक्ताची गरज भासल्यास तातडीने उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र स्थापना दिवस व कामगार दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ चोपडा व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी आसकरण ताराचंद जैन रक्तपेढीच्या हॉल मध्ये रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले.
या शिबीराला चोपड्याचे तहसीलदार अनिल गावित यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये सोशल डिस्टिंगचे नियम पाळत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरास यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष -नितीन जैन, सचिव धिरज अग्रवाल, प्रकल्प प्रमुख – डॉ वैभव पाटिल व डॉ प्रफुल्ल पाटिल , भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष क्षितीज चोरडीया, विभागीय सदस्य लतिष जैन व सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. रोटरीचे जेष्ठ सद्स्य एम.डब्लू.पाटील, व्ही.एस.पाटील, दिलीप जैन आदींनी भेट दिली होती तसेच आसकरण ताराचंद जैन रक्तपेढीचे अनमोल सहकार्य मिळाले.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००