चाळीसगाव, प्रतिनिधी । आज जिल्हाभरात पोलिओ लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून तालुक्यातील चैतन्य तांडा क्र.४ येथील अंगणवाडीत शुन्य ते पाच वर्षाआतील लहान मुलांना पल्स पोलिओ लसीकरण सरपंच अनिता दिनकर राठोड याच्या हस्ते चिमुकल्याला प्रथम पल्स पोलिओ डोस देऊन लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
कोरोना लसीकरणामुळे पुढे ढकलण्यात आलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज जिल्हाभरात राबविण्यात आली. शुन्य ते पाच वर्षा आतील चिमुकल्यांना डोस देण्यात आले. तालुक्यातील चैतन्य तांडा क्र.४ येथे ही मोहिम अंगणवाडीत राबविण्यात आली. चैतन्य तांडा क्र.४ च्या लोकनियुक्त सरपंच अनिता दिनकर राठोड यांच्या हस्ते पहिल्या बालकाला पल्स पोलिओ डोस येथील देण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका शोभा चव्हाण व मदतनीस उषा पवार व आशा सेविका कविता जाधव आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्व सरपंच अनिता राठोड यांनी पटवून सांगितले.