यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गायरान मधील विहीरीतून होणऱ्या वार्ड क्रमांक १ मध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यातून जंतूयुक्त व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून यामुळे गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र ग्रामसेवक एक महिन्यापासून गैरहजर असल्याने ग्रामस्थांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.
चुंचाळे ग्रामपंचायतीने गायरान येथील विहीरीतून दुषीत पाणीपुरवठा होत असल्याने मागील दोन आठवड्यांपासून सफाई कामगार नसल्यामुळे गटारी देखिल तुंडूब भरल्या आहे. सरपंच व कधी न येणारे ग्रामसेवक साहेब यांनी तात्काळ लक्ष द्यावे याबाबत माजी ग्रा.पं. सदस्य विठ्ठल राजपूत यांनी जि.प. आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. चुंचाळे गावातील तिन ते साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव असून शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनेतून लाखो रुपये खर्च केला आहे. गावात विना टि.सी.एल. पावडरचा पाणीपुरवठा होत असतो. १० रोजी गायरान या भागातील विहिरीवरुन होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून वार्ड क्रमांक १ व ३ या भागातील जवळपास ४० ते ५० कुंटुबांच्या झालेल्या पाणीपुरवठ्यात लाल रंगाचे जंतु तर अतिशय दुर्गधीयुक्त पाणी येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे येथील ग्रामपंचायतीचा कारभाराचा भोगळपणा समोर आला आहे.
महिना भरापासून ग्रामसेवकच येईना
येथे ग्रामसेवक म्हणून पदभार असलेले ग्रामसेवक सपकाळे हे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून अवघ्या काही दिवस गावात आले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत असून वरीष्ठानी त्वरीत दखल घेत कारवाई करण्याची मागणी होत आहे तरी या गंभीर विषयाकडे आरोग्य विभागाने देखील लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे यांच्या घरात आले. जंतुयुक्त पाणी प्रकाश चौधरी, सुधाकर पाटील, गोकुळ कोळी, दिलीप नेवे, उदय चौधरी, अरुण कोळी, सजय राजपुत, धनसिंग राजपुत अश्या अनेक घरामंध्ये जंतू दिसुन आले.