Home धर्म-समाज चीन: करोना बळींची संख्या दोन हजाराच्यावर पोहोचली

चीन: करोना बळींची संख्या दोन हजाराच्यावर पोहोचली


karona
 

बीजिंग (वृत्तसंस्था) करोनाच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत २११८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७४ हजार ५७६ जणांना करोनाची लागण झाली आहे.

 

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने बुधवारपर्यंतची आकडेवारी जारी केली आहे. बुधवारी चीनमधील ३१ प्रांतामध्ये करोनाची लागण झालेले ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हुबेई प्रातांत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, हेबेई, शांघाई, फुजियान, शनदोंग, युन्नान आणि शानक्सी प्रांतात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी करोनाचा संसर्ग झालेले ३९४ नवे रुग्ण दाखल झाले आहेत. दरम्यान, चीनमध्ये करोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण डिसेंबर महिन्यात आढळला होता.


Protected Content

Play sound