नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभक्त लडाखचे नागरिक चीनच्या घुसखोरीविरोधात आवाज उठवत आहेत. ते ओरडून-ओरडून सावध करत आहेत. त्यांच्या या इशाऱ्याकडे डोळेझाक करणे महागात पडू शकते, असा इशारा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत लडाखचे काही नागरिक चीनी घुसखोरीबाबत बोलत आहेत. चीनने आमची जमीन घेतल्याचे लोक सांगताना दिसत आहेत. चीनी सैनिकगलवान खोऱ्यात १५ किलोमीटर आत आल्याचे एक नागरिक या व्हिडिओत सांगत आहे. आमच्या भूमीवर चीनचा कब्जा वाढत असल्याते लडाखचे नागरिक या व्हिडिओत सांगत आहेत. या व्हिडिओत चीनी घुसखोरीबाबत तसेच त्यांच्या हालचाली दाखवणारी काही छायाचित्रेही दाखवण्यात आली आहेत. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘देशभक्त लडाखचे नागरिक चीनच्या घुसखोरीविरोधात आवाज उठवत आहेत. ते ओरडून-ओरडून सावध करत आहेत. त्यांच्या या इशाऱ्याकडे डोळेझाक करणे महागात पडू शकते. भारतासाठी कृपा करून त्यांचे म्हणणे ऐकावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.