बंगळुरू : वृत्तसंस्था । अमेरिकन आणि युरोपातील कंपन्या चीनला पर्यायी बाजारपेठ म्हणून भारताला पसंती देत आहे. ‘अॅपल’ने मागील काही महिन्यात भारतातील गुंतवणूक वाढवली असल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
अमेरिका आणि चीनमधील सुरु असलेला व्यापारी संघर्ष, कोरोना व्हायरसच्या निर्मितीवरून संशयात सापडललेया चीनची दिवसागणिक कोंडी होत आहे.
जगभरातील बड्या कंपन्या चीनला पर्याय शोधत आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन आधारित अनुदान आणि सवलत योजना जाहीर केली आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. त्यानुसार सॅमसंग, फॉक्सकॉन, रायझिंग स्टार, विस्ट्राॅन या सारख्या कंपन्यांनी सरकारकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव सादर केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
‘ ज्यात मागील काही महिन्यात त्यांनी इथे उत्पादन आणि जोडणीसारखे युनिट सुरु केले आहेत. चीनमधून जवळपास नऊ युनिट ‘अॅपल’ने भारतात हलवले असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समिटचे उदघाटन केले. ते म्हणाले की , ५ वर्षांपूर्वी आपण डिजिटल इंडिया मोहिमेला प्रारंभ केला होता. आज, मला सांगण्यास आनंद वाटतो की, यापुढे डिजीटल इंडियाला कोणताही एखादा सरकारी उपक्रम म्हणून पाहिले जात नाही. उपेक्षित आणि सरकारमधील लोकांसाठी डिजिटल इंडिया ही आता लोकांची जीवनशैली बनली आहे, असे म्हणता येईल. आपल्या देशाने विकासाबाबत अधिक मानव केंद्रित दृष्टिकोन ठेवला आहे, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्या नागरिकांच्या जीवनात अनेक बदल घडून आले आहेत. त्याचे फायदे सर्वांनाच दिसत आहेत.
आपल्या सरकारने डिजिटल आणि तंत्रज्ञान उपायांसाठी, यशस्वीरित्या बाजारपेठ तयार केली आहे, मात्र सर्व योजनांचा एक भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. तंत्रज्ञान प्रथम हे शासकीय पद्धतीचे मॉडेल असून ते महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आपण मानवी सन्मान वाढविला आहे. हजारो शेतकऱ्यांना एका क्लिकवर आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले आहे. भारत जर आयुष्मान भारत, ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना, हाताळत असेल, तर हे केवळ तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळेच शक्य आहे.असे त्यांनी सांगितले.