वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीननं वारंवार फसवणूक केली आहे. चीनने या व्हायरससंदर्भात चुकीची माहिती दिल्यानंतर त्याचे पूर्ण जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच, परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही, पण त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावे, अशी थेट धमकीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली आहे. व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सतत कोरोना व्हायरसच्या संबंधीची माहिती लपवल्याचा आरोप केलेला आहे. या विषाणूसंदर्भात चीनने प्रारंभिक माहिती लपवल्याने त्याचा जगाला परिणाम भोगावा लागत आहे. कोरोना व्हायरस हा चिनी व्हायरस असून, जग त्यांच्या चीनच्या कर्मांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगतो आहे. वेळेत माहिती दिली असती तर कोरोनाला चीनमध्येच रोखता आले असते, असेही ट्रम्प म्हटले. चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच, परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही, पण त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावे, अशी थेट धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेत चीनला दिली.