एरंडोल, प्रतिनिधी । येथे आज दि.२० जुन रोजी एरंडोल तालुका व शहर मनसेतर्फे चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या पुतळ्याला चपला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला व यावेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले.
चीनने केलेल्या हल्ल्यात आपले २० जवान शहीद झाले. यामुळे चिनी मालावर बहिष्कार टाकुन चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या पुतळ्याला चपला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवरे यांना मनसेतर्फे देण्यात आले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार, मनसे शहर अध्यक्ष गोकुळ वाल्डे, उपविभाग अध्यक्ष सागर पाटील, मनसे महासैनिक विजेंद्र वाघ, मनसे महासैनिक अनिल पाथरवट यांच्या निवेदनावर सह्या आहेत.