चीअर्स…. लवकरच देशभरातील सर्व दारू दुकाने उघडणार !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । एकीकडे लॉकडाऊन वाढत असतांना देशभरातील सर्व दारू दुकाने सुरू करण्याला केंद्र सरकारने आजच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून परवानगी दिली असून यासाठी काही अटी घालण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारने आजच लॉकडाऊनचा कालावधी हा १७ मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. दरम्यान, या दोन आठवड्यांमध्ये काही दुकानांना सशर्त परवानगी देण्यात येणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. यातच मद्याची दुकाने सुरू करावी अशी मागणी देखील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. काही मुख्यमंत्र्यांनी देखील याच प्रकारची मागणी केली होती. या संदर्भात आज केंद्र सरकारतर्फे एक नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. यानुसार आता देशभरातील दारूच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, यात रेड झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. तथापि, रेड झोनमध्ये दुकाने सुरू होतील की नाही ? याबाबतचा निर्णय राज्य सरकारांना घ्यायचा आहे. यामुळे प्रारंभी ग्रीन व ऑरेंज झोनमधील वाईन शॉप्स सुरू होतील अशी शक्यता आहे.

Protected Content