पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असणार्या चिलगाव फाट्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.
त्र्यंबक ओंकार गोपाळ हे पत्नी देवकबाई, पुतण्या समाधान यांच्यासह शुक्रवारी दुपारी ४ वाजता कोल्हे येथून जुनोने (ता.जामनेर) येथे त्यांची मुलगी दीपालीच्या हळदीला जाण्यासाठी निघाले होते. ते पहूरकडे प्रवास करत असताना शेंदुर्णीच्या पुढे चिलगाव फाट्याजवळ दुचाकी अचानक घसरली. त्यात त्र्यंबक गोपाळ, देवकबाई गोपाळ व पुतण्या समाधान हे तिघे खाली कोसळले. या घटनेत देवकाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे.