जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन घड्याळ देण्याचे बहाणाकरून जवळ बोलवून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला जळगाव जिल्हा न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि १६ हजार रुपये दंड अशी शिक्षेचा निकाल बुधवार १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या एका गावात ११ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ जुलै २०१७ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना गावातील मनोज सुरेश सोनवणे (वय-२७) रा. ममुराबाद ता.जि. जळगाव याने मुलीला घड्याळ देण्याचा बहाणा करून तिचे तोंड दाबत तिचा विनयभंग केला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी आणि तिची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी व पुराव्या अंती न्यायालयाने मनोज सुरेश सोनवणे याला दोषी ठरवत विविध कलमान्वये ४ वर्षे सक्तमजुरी आणि १६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी युक्तिवाद केला. याकामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.