सावदा प्रतिनिधी । जेटी महाजन पॉलिटेक्नीक कोवीड सेन्टरने संशयित रूग्णांचे पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून यात रावेर तालुक्यातील चिनावल येथील दोन रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती चिनावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी विजया झोपे यांनी दिली.
सावदा शहराबरोबर चिनावल गावातही कोरोनाने थैमान घातले आहे. जेटी महाजन पॉलिटेक्नीक कोवीड सेन्टरने संशयित रूग्णांचे स्वॅबचा तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात चिनावल येथील दोन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याचे निष्पन्न झाले. आढळून आलेले दोन्ही रूग्ण पुरूष आहेत. चिनावल शहरात दिवसेंदिवस रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. चिनावल शहरात आतापर्यंत एकुण ३५ रूग्ण कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी दोन कोरोनाबधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या वृत्ताला चिनावल येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी विजया झोपे यांनी दुजोरा दिला आहे.