सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या चिनावल येथे आज चार नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून त्यांचा रहिवास असणार्या परिसरात प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर करण्यासह अन्य उपाययोजना केल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चिनावल येथे कोरानाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. यातच आज येथे कोरोनाचे चार नवीन रूग्ण आढळून आले. यात गावातल्या चिंचवाड परिसरातल्या एकाच घरातील तिघे तर याच भागातल्या एका अन्य रूग्णाचा समावेश आहे. चिनावल येथे आजवर एकूण ३३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यातील दोघे मयत झाले आहेत. १५ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून इतरांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चिनावल येथे चार रूग्ण आढळून आल्याच्या वृत्ताला स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया झोपे यांनी दुजोरा दिला आहे. या रूग्णांचा रहिवास असणार्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून हा भाग सील करण्यात आला आहे.