सावदा ता.रावेर (प्रतिनिधी )। रावेर तालुक्यातील चिनावल आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकाला कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाल्याची माहिती चिनावल ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. विजया झोपे यांनी दिली.
रावेर तालुक्यात चिनावल येथील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असलेले ५० वर्षीय आरोग्य सेवकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत आरोग्य सेवकाचा अहवाल पॉझिटव्ह असल्याचे प्राप्त झाले. चिनावल येथे एकुण ४१ रूग्ण बाधित झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण बरे होवून घरी सोडण्यात आले आहे. चिनावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. विजया झोपे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.