जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चित्रा चौकात जेवणासाठी आलेल्या व्यापाऱ्यांच्या कारचे काच फोडून पैशांची बँग चोरी केल्याची घटना सोमवारी १७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शिरपूर येथील फर्टीलायझर विक्रीचा व्यवसाय असलेले जितेंद्र शालीग्राम भदाणे हे एका मित्रासह जळगांवमार्गे चारचाकी क्रमांक (एमएच १८ बीसी ०२५७) ने जामनेर जात होते. सोमवारी १७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास चित्रा चौकात असलेल्या एका फर्टीलायझर दुकानाच्या बाहेर त्यांनी कार उभी केली आणि जेवणासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेले. दोघे जेवण करुन परत आले असता त्यांना मागील दरवाज्याची काच फुटलेली दिसून आली.
कारमध्ये डोकावून पहिले असता मागील सीटवर ठेवलेली बॅग त्यांना दिसून आली नाही. दोघांनी तात्काळ शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन सर्व जाणून घेतले. बॅगमध्ये १० हजारांची रोकड आणि महत्वाचे दस्तऐवज होते. दरम्यान, शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.