चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील चितेंगाव येथील पोलिस पाटील भोसले यांच्या गावातील कांद्याची चाळ अज्ञाताने पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील चितेंगाव येथील पोलिस पाटील श्रीकृष्ण भानुदास भोसले (वय-३८) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांची गावातील प्लॉट भागात कांद्याची चाळ आहे. या चाळीला अज्ञात इसमाने पेटवून पसार झाल्याची धक्कादायक घटना आज रात्री १:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. यात भोसले यांचा सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भोसले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ प्रविण संगेळे हे करीत आहे.