
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत शॉरमामधून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईमधील मानखुर्द भागात एका १९ वर्षीय मुलाचा शॉरमा खाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रथमेश भोकसे असे मृत मुलाचे नाव आहे. मानखुर्दमध्ये एका स्टॉलवर प्रथमेश भोकसे याने शॉरमा खाल्ला. त्यानंतर त्यांला त्रास होऊ लागला असता त्या ठिकाणी शॉरमा खालेल्या इतर दहा ते बारा जणांनाही त्रास सुरू झाला.
यातील अनेक लोकांना उलटया, जुलाबाचा त्रास होत होता. प्रथमेशला शुक्रवारी 3 मेला तातडीने रूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी ७ मे रोजी आज मंगळवारी मृत्यू झाला. शॉरमातील चिकन खराब असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा खराब शॉरमा खाल्ल्याने प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्या लोकांनी शॉरमासाठी लागणारे मांस कुठून आणले होते, त्याची चौकशी पोलीस करत आहेत. मुलाचा मृत्यू झाल्यामुळे शॉरमा विक्रेत्याविरोधात मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




