मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील तब्बल ७८६ पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे सात पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आजच्या घडीला कोरोनाग्रस्त पोलिसांपैकी ७०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ७६ पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. दुसरीकडे पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना देखील वाढतच आहेत. लॉकडाऊन कालावधीत पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या २०० घटना घडल्या आहेत आणि त्यासाठी ७३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात दोन पोलिसांवर एका तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली. दरम्यान, देशामध्ये गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे एकूण ३२७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ६२९३९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात २१०९ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.