नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट झाली आहे. तर देशातील कोरोनाबळींचा आकडाही चीनपेक्षा जास्त झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
भारतात कोरोनाचे एकूण 1 लाख 65 हजार 799 रुग्ण आहेत. तर जिथून ‘कोरोना’चा उगम झाला, त्या चीनमध्ये एकूण 82 हजार 995 रुग्ण आहेत. म्हणजेच भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट झाली आहे. तर भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 4,711 वर गेली असून भारताने कोरोनाबळींमध्ये चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये 4,634 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीतही भारत पुढे सरकताना दिसत आहे. तुर्कीला मागे टाकून भारत आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे.