चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज सापडले १७ कोरोना पॉझिटिव्ह !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज (मंगळवार) दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहर १०, कल्याणे खुर्द आणि साळवा प्रत्येकी २ तर एकलग्न, उखळवाडी आणि पाळधी खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

धरणगाव कोवीड केअर सेंटरला मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात शहरातील बालाजी गल्ली, संजय नगर, गुजराथी गल्ली, गुरव गल्ली, साहिल नगर, पारधी वाडा, मराठे गल्ली प्रत्येकी एक तर गणा बाप्पा नगरमध्ये ३ असे एकूण १० रुग्ण धरणगावात आढळले आहेत. तर कल्याणे खुर्द- आणि साळवा प्रत्येकी २ तर एकलग्न, उखळवाडी आणि पाळधी खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३६४ झाली आहे. तर साधारण ९३ रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत साधारण २४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २३ जण मयत झाले आहेत. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content