Home आरोग्य चिंताजनक : गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

चिंताजनक : गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

0
61


मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 1671 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण 18 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

आतच्या घडीला अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची सर्वाधिक मुंबईत आहे. आतापर्यंत राज्यात 174 पोलिस अधिकारी तर 1497 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर 18 पोलिसांना करोना मुळे जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 673 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई पोलिसाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आता 65 लाखाची मदत केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound